Call Now
Call Now

सुवर्णबिंदू प्राशन

               लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचे किंवा संसर्ग जडण्याचे प्रमाण अधिक असते  त्यामागील प्रमुख  कारण म्हणजे  कमकुवत 'रोगप्रतिकार शक्ती' !

            मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी प्राचीन काळापासून आयुर्वेदात लहान मुलांवर ' सुवर्णप्राशन संस्कार' करण्याचा सल्ला दिला जातो. याचे वर्णन काश्यप संहिता मध्ये आहे. सोन्याचे भस्म काही आयुर्वेदिक  औषधांमध्ये मिसळून त्यांचे एकत्र मिश्रण बनवले जाते.

 
काश्यप संहितेमधील वर्णन :-
     सुवर्णप्राशन हि एतत मेधाग्निबलवर्धनम्। आयुष्यं मंगलम पुण्यं वृष्यं ग्रहापहम् ।। मासात् परममेधावी क्याधिर्भिनर च धृष्यते। षड्भिर्मासै: श्रुतधर: सुवर्णप्राशनाद भवेत् ।।


सुवर्णप्राशनाचे फायदे -

1.बालकाची मेधा-बुद्धी वाढते-लहान मुलांच्या बुद्धी चा विकास अंत्यंत गरजेचे असते. त्यामुळे पोषक आहाराबरोबरीनेच 'सुवर्णप्राशना'चे काही थेंब मुलांना दिल्यास त्यांचा मेंदूचा विकास होतो तसेच बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.

2.चांगली भुक लागते- पचन शक्ती सुधारते - आजकाल भाज्या, फळ झटपट उगवण्यासाठी काही रासायनिक खतांचा, औषधांचा पिकांवर फवारा केला जातो. अशा घातक घटकांपासून बचावण्यासाठी मुलांना दिलेले 'सुवर्णप्राशन' अमृतच ठरते.

3.शारीरिक बळ वाढते-लहान मुलांमध्ये पोषक आहाराच्या अभावामुळे शरीरात कमकुवतपणा वाढण्याची  भीती दूर होते.
4.शरीराची कांती वाढते -लहान मुलांच्या त्वचेचा रंग सुधारण्यासाठीही ' सुवर्णप्राशन' फायदेशीर ठरते.  
5.आकलन क्षमता सुधारते  -  लहान मुलांमध्ये चंचलता अधिक असल्याने त्यांचे अभ्यासात लक्ष न लागण्याची समस्या अनेकांमध्ये आढळते. अशावेळी त्यांच्यामध्ये स्थिरता आणून 'आकलन' व एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी 'सुवर्णप्राशन' मदत करते.

            लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक्षमता वाढून त्यांचे अनेक रोगांपासून संरक्षण होते, असे महर्षी काश्यप म्हणतात. हे सुवर्णप्राशन बालकांसाठी मंगलकारक आणि पुण्यकारक आहे. सुवर्णप्राशन नियमितपणे १ महिना केल्यास बालक बुद्धीमान आणि निरोगी होते. तसेच ६ महिने नियमितपणे केल्यास त्याची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र होते असेही ते म्हणतात.
ऋतूचक्रात बदल झाल्यास त्याचा तात्काळ परिणाम लहान मुलांवर होतो.  वारंवार मुलं आजारी पडत असल्यास अशावेळी त्यांची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच बदलत्या ऋतूमानाशी जुळवून घेण्याची क्षमता वाढवण्याचे काम 'सुवर्णप्राशन' करते.  
नवजात बालकांपासून ते 12 वयोवर्षाच्या मुलांपर्यंत सार्‍यांना या औषधांचे काही थेंब दिले जातात.


(सूचना :- मार्केट मध्ये सुवर्णबिंदूच्या नावाने फसवून होऊ शकते यासाठी हे औषध हे जवळच्या वैद्यांकडून बनवून घ्यावे.)


वैद्य योगेश नागणे.
आयुकेअर चिकित्सालय,
पंचकर्म व लिच थेरपी सेंटर,
जत,सांगली
संपर्क : 7028576354