Call Now
Call Now

व्हेरीकोज व्हेन्स आणि आयुर्वेद

सर्वप्रथम व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय ते जाणून घेऊ.
       आपल्या शरीरात अशुद्ध रक्तवहन करण्यासाठी व्हेन्स म्हणजे शीरा असतात. पायातील रक्ताला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात रक्त प्रवाहित व्हावे लागते. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे पडदे अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये असतात. ते एकाच दिशेने रक्तप्रवाह करण्यास सहाय्यक ठरतात. मात्र, जास्त वेळ उभे राहिल्याने वा बसल्याने शीरांमध्ये ताण निर्माण होतो व पडदे निकामी होण्यास सुरवात होते . त्यामुळे अधिक रक्त जमा झाल्यामुळे शीरा फुगतात.
       या त्रासाला व्हेरिकोज व्हेन्स (varicose veins) म्हणजे मराठीत 'अपस्फित नीला' असे म्हणतात. अनेकदा या रक्तवाहिन्या पायाच्या पृष्ठभागावर ठळकपणे दिसू लागतात. बरेचदा रक्तवाहिन्या दिसत नसल्या तरी व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असू शकतो. अनेकदा पाय फार दुखतोय् असे आपल्याला जाणवते. पण फार थकलोय् असे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यासाठी अन्य लक्षणांचा आढावा घेणे आवश्यक असते.

लक्षणे:-
1.पाय सुजणे
2.संध्याकाळी पाय दुखणे
3.असह्य वेदना होणे
4.झोप न येणे
5.पायाच्या पोटऱ्या दुखणे
6.निळ्या नसा फुगलेल्या दिसतात
7.क्वचित पाय देखील काळवंडलेला असतो
8.अल्सर अथवा जखम निर्माण होते
9.घोट्याच्या वरचा भाग काळा होऊ लागतो
10.पायांवर सुजलेल्या नसांचे जाळं दिसते
11.पायांमध्ये गोळे येतात

ही कारणे घेऊन डॉक्टरांकडे जाणाऱ्या निम्म्या लोकांना व्हेरिकोज् व्हेन्सचा त्रास असल्याचे आढळून आले आहे.
व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास वेदनादायी असतो पण त्यावर केवळ तात्पुरते पेनकिलर्सचे सेवन करून वेदना शमवणे पुरेसे नाही. कारण वेळीच व्हेरिकोस व्हेन्सवर उपचार न केल्यास हा त्रास वाढून त्यामधून व्हेरिकोस अल्सर-जखमा देखील बळावण्याचा धोका असतो.

चिकित्सा दिशा :-
रक्तवाहिन्या ह्या रक्त धातू पासून बनलेल्या असतात. यासाठी विशेषतः रक्त धातू ची चिकित्सा करणे अपेक्षित आहे. जवळच्या वैद्यांना भेटून सविस्तर माहिती घ्यावी , कारणे जाणून घ्यावीत व त्यानुसार चिकित्सा घ्यावी.

1. सर्वप्रथम जास्त वेळ उभे राहून काम करणे टाळावे, किंवा अधून मधून विश्रांती घ्यावी (निदान परिवर्जनम)
2. रक्तशोधक औषधे, वातानुलोमन औषधे
3. अभ्यंग - दररोज तेलाचा मसाज करावा
4. जखमा असतील तर व्रणशोधक व व्रणरोपक औषधांचा वापर
5. जलौकावचरण - (Leech Therapy) ही पंचकर्मांतील एक उपचारपद्धती आहे. या पद्धतीचा वापर करून शस्त्रक्रियेशिवाय व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास कमी करता येऊ शकतो. अल्सर , जखमा देखील या उपचाराने बरे होतात.
6. इत्यादी


वैद्य योगेश नागणे.
आयुकेअर चिकित्सालय,
पंचकर्म व लिच थेरपी सेंटर,
जत,सांगली
संपर्क : 7028576354