Call Now
Call Now

मायग्रेन- अर्धावभेदक -आयुर्वेद

          मायग्रेन हा वारंवार उद्‍भवणारा गंभीर व डोके ठणकवणारा आजार आहे. जो कधी डोक्याच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना जाणवतो.आयुर्वेद शास्त्रामध्ये या आजारास अर्धावभेदक असे संबोधले आहे .

जगात डायबे‌टिस व दमा या पेशंटांपेक्षाही मायग्रेनचे पेशंट अधिक प्रमाणात आढळतात. पण, तरीही मायग्रेनविषयी फारशी जागृती नाही. सामान्य डोकेदुखी म्हणून याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि केमि स्टकडून औषधे घेऊन तात्पुरता दिलासा मिळवतात.


मायग्रेनचा त्रास होण्याची अनेक कारणे असू शकतात.

1.नैसर्गिक वेग थांबवून ठेवल्याने
2.मोठ्या आवाजात बोलण्याने
3.उग्र वास
4.धूर ,धूळ
5.उन्हात फिरणे
6.अति शीत पाणी पिणे / स्नान करणे
7.डोक्याला मार लागणे
8.जड -आम्ल हरित पदार्थ सेवन
9.नवीन वातावरण सात्म्य न झाल्याने
10.उच्च रक्तदाब
11.अपूरी झोप, दिवसा झोपणे
12. ताण-तणाव/ मनःस्ताप / भय
13. अधिक प्रमाणात पेनकिलर घेणं
14. वातावरणातील बदल
15. अॅलर्जी
16. धूर
17. हॉर्मोन्समधील बदल
18. सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे
इत्यादी..

प्रत्येक व्यक्तीमधील मायग्रेनचे  कारण वेगळे असू शकते.कोणत्याही आजाराच्या लक्षणावरून त्यावर उपचार करणे सोपे जाते. यासाठी मायग्रेनची लक्षणे अवश्य जाणून घ्या.
1. भूक कमी लागणे
2. कामात रस न वाटणे
3. डोक्याचा अर्धा भाग दुखणे
4. घाम सुटणे
5. मळमळ, उलटी
6. प्रखर उजेड आणि तीव्र आवाज सहन न होणे
7. अशक्तपणा
8. डोळे दुखणे
9. धुसर दिसू लागणे
10. काही विशिष्ट खाद्यपदार्थांची अॅलर्जी असणे
11. सूर्योदयापासून डोकेदुखी सुरुवात होणे ,सूर्यास्त होईल तसे बरे वाटणे


चिकित्सा दिशा :-
सर्वप्रथम जवळच्या वैद्या कडून डोकेदुखीची कारणे जाणून घ्यावी व ती दूर करावीत.
चिंतेचे विषय दुर्लक्ष करावेत.
नियमित मलप्रवृत्ती व झोप याची दक्षता घ्यावी.
शिळे,तिखट,आंबट,उष्ण,जड पदार्थ टाळावेत .
यासोबत शीर :शुलाच्या प्रकारानुसार नस्य , शिरोधारा ,रक्तमोक्षण, विरेचन इत्यादी उपचार केल्याने या व्याधीतुन पूर्णपणे सुटकारा मिळतो.

वैद्य योगेश नागणे.
आयुकेअर चिकित्सालय,
पंचकर्म व लिच थेरपी सेंटर,
जत,सांगली
संपर्क : 7028576354