Call Now
Call Now

गुडघेदुखी

         गुडघेदुखी ही पूर्वी वय झाल्यावर उद्भवणारी समस्या आता कमी वयातच उद्भवायला लागली आहे. विविध कारणांनी गुडघ्यांची झीज होते त्यामुळे गुडघेदुखी उद्भवते.गुडघेदुखीमुळे बाहेर जाणे, कार्यक्रमांना उपस्थित राहणे यांसारख्या गोष्टींवर बंधने येतात. कोणाकडे लिफ्ट नसेल तर अडचण येते, तर कधी टेबल-खुर्चीची सोय नसेल तर गैरसोय. विशेषत: महिलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणत उद्भवत असल्याचे चित्र आहे.

कारणे :-
1. सतत कष्टाची कामे करणे
2. चुकीच्या पद्धतीचा आहार (वातवर्धक आहार)
3. सतत गाडीवर फिरणे
4. दीर्घ काळ उभे राहणे
5. लठ्ठपणा
6. व्यायामाचा अभाव
7. अभ्यंगाचा अभाव (तेलाची मालिश)
8. एकाच ठिकाणी बसून राहणे
9. अति प्रमाणात थंड पदार्थ सेवन
10. फ्रिज मधील खाद्यपदार्थ ... इत्यादी ..

उपाय :-
1. पौष्टिक आहार
2. लठ्ठपणा असेल तर तो कमी करावा
3. नियमित व्यायाम
4. रात्री जागरण करू नये
5. नियमित तीळ तेलाची मालिश
6. महिलांनी बसून स्वयंपाक करावा
7. जास्त वेळ बसू किंवा उभे राहू नये
8. दूध, डिंकाचे लाडू याचे सेवन

आयुर्वेद उपचार :-
नुसताच वेदनाशामक औषधे घेऊन हा आजार ठीक होत नाही. यासाठी गुडघ्यांमध्ये झालेली झीज भरून काढणे गरजेचे असते.

1. वातशामक औषधे
2. जानू बस्ती
3. जलौकावचरण (Leech Therapy)
4. पोट्टली स्वेद
5. पत्र पिंड स्वेद ... इत्यादी

वरील उपचारांनी गुडघे दुखी कमी होते एवढेच नव्हे तर शस्त्रक्रिया ही टाळता येते.

सांधे दुखी सोबत सांध्यांना सूज, अपचन, हलका ताप, काम न करता थकवा इत्यादी कारणे असतील तर तो आमवात आहे. त्याबद्दल पुढील लेखात माहिती घेऊ.

वैद्य योगेश नागणे.( आयुर्वेद तज्ञ् )
आयुकेअर आयुर्वेद क्लिनिक ,
पंचकर्म व लिच थेरपी सेंटर,
जत,सांगली
संपर्क : 702857635