Call Now
Call Now

उत्तरबस्ती

उत्तरबस्ती

             विशिष्ट प्रकारचे औषधे गर्भाशयात किंवा मूत्राशयात सोडले जातात यालाच उत्तरबस्ती म्हणतात. पंचकर्मा मध्ये उत्तरबस्तीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गर्भाशयात दिली जाणारी आणि दुसरी मूत्रमार्गात (मूत्राशयात) दिली जाणारी.

1)गर्भाशयात दिली जाणारी उत्तरबस्ती -

      गर्भाशयात सोडायचे विशिष्ट औषधी सिद्ध तेल किंवा तूप निर्जंतूक करून ते गर्भाशयात सोडणे. या प्रकारची उत्तरबस्ती गर्भाशयाच्या आजारांमध्ये दिली जाते.

     हा विधी पाळीच्या ५ व्या ते ८ व्या दिवसांपर्यंतच गर्भाशयाचे मुख खुले असल्याने हा विधी करता येणे शक्य होते. इतर वेळी गर्भाशयात उत्तरबस्ती करता येत नाही.जिथे गर्भाशयात उत्तरबस्ती शक्य नसतो त्या ठिकाणी योनीपिचू हा विधी करावा लागतो.

गर्भाशयातील उत्तरबस्ती कधी करतात -
1)वारंवार होणारे गर्भपात
2)ट्युबल ब्लॉक
3)अनियमित मासिक पाळी
4)गर्भाशयाची शुद्धी करण्यासाठी
5)fallopian tube block
6)PCOD/POS/PCOS
7)Uterine Fibroid
8)अंगावरून पांढरे पाणी आणि लाल पाणी सतत जाणे 9)hormonal imbalance
इत्यादी ...
गर्भाशयाला बल देण्यासाठीसुद्धा उत्तरबस्तीचा उत्तम उपयोग होतो. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी स्त्रियांनी उत्तरबस्ती घेतला तर गर्भाशयाला बल मिळून गर्भावस्थेत फारसे उपद्रव होत नाहीत, असा अनुभव आहे.

2)मूत्रमार्गात दिली जाणारी उत्तरबस्ती -
कॅथेटरच्या साहाय्याने विशिष्ट प्रकारचे औषध मूत्रमार्गात सोडले जाते. युरेथ्रल स्ट्रिक्चर (मूत्रनलिका संकोच) मात्र कॅथेटर न घालता ग्लास सिरिंजच्या साहाय्याने उत्तरबस्ती द्यावी लागते. ही प्रक्रिया पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये करता येते.

मूत्रमार्गातील बस्ती कधी करतात -
1)मूत्रप्रवृतीवर नियंत्रण नसणे
2)खोकताना-शिंकताना मूत्रप्रवृती होणे
3)युरेथ्रल स्ट्रिक्चर (मूत्रनलिका संकोच)
4)पुरुषामध्ये पौरुषग्रंथी वृद्धी (प्रोस्टेट ग्लॅन्ड)
5)अडखळत मूत्रप्रवृती होणे
इत्यादी ...
        

             पुरुषांमध्ये मूत्रमार्ग व वीर्यस्रावाचा मार्ग एकच असल्याने वीर्यासंबंधी दोषांमध्येसुद्धा उत्तरबस्ती उपयुक्त ठरते. त्यामुळे शुक्रजंतूची संख्या कमी असणे, शुक्राणूंचे बल किंवा गती कमी असणे, अशा विविध कारणांमुळे पुरुषांत येणाऱ्या वंध्यत्वावर उत्तरबस्तीचा उत्तम उपयोग होतो.

वैद्य योगेश नागाणे.
आयुर्वेदाचार्य,आयुकेअर चिकित्सालय,
जत. 7028576354