Call Now
Call Now

आमवात - Rheumatoid arthritis

         आम - म्हणजे अपक्व आहार रसवात - शरीरात प्रकोपित झालेला वातदोष आपण सेवन केलेल्या आहारावर पचन प्रक्रिया होऊन प्राकृत आहाररस तयार होतो. काही कारणास्तव जसे की पचनशक्ती कमी झाली असता हा तयार होणारा आहाररस पक्व स्वरूपात तयार न होता अपक्व स्वरूपात तयार होतो व आमनिर्मिती होते.
याच्याच सोबतीने वातप्रकोपक आहार-विहाराच्या सेवनाने प्रकोपित झालेला वातदोष या अपक्व आहार रसास (आम) शरीरातील विविध सांध्यांच्या ठिकाणी नेऊन आश्रयित होतो व आमवात आजार उद्भवतो.
रुमेटाइड आर्थराइटिस हा इम्यून सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती मध्ये विपरीत परिणाम झाल्याने हा आजार होत असतो असे आधुनिक शास्र सांगते.

आमवाताची कारणे
1. अग्निमांद्य (पचनशक्ती मंदावणे)
2. विरुद्ध आहार-विहाराचे सेवन
3. जड आहाराचे सेवन.(दही,आंबवलेले पदार्थ,मांसाहार)
4. दीर्घकाळपर्यंत शिळ्या पदार्थांचे सेवन
5. अति उपवास करणे
6. मलमूत्रादी वेगांना थांबवून ठेवणे
7. रात्री अति प्रमाणात जागरण
8. वातप्रकोपक आहारविहार
9. दिवास्वाप (दिवसा झोपणे)
10. व्यायामाचा पूर्णत: अभाव

आमवाताची लक्षणे.
1. सांध्यांच्या ठिकाणी वेदना.
2. वेदना ह्या विंचू चावल्याप्रमाणे (सुई टोचल्याप्रमाणे)असते.
3. सांध्यांच्या ठिकाणी सूज.
4. सांध्यांच्या ठिकाणी उष्ण स्पर्श जाणवणे.
5. सांध्यांच्या ठिकाणी लालसरपणा.
6. सकाळी हातपायाची बोटे जखडणे.
7. एकाच वेळेला विविध सांध्यांमध्ये वेदना.
8. ताप जाणवणे.
9. सांध्यांची काम करण्याची क्षमता कमी होणे.
10. भूक कमी लागणे.
11. आळस असणे

आयुर्वेद उपचार
व्याधीबल, रुग्णबल, प्रकृती इत्यादी गोष्टींचा विचार करून आमपाचक औषधे , वातशामक औषधे तसेच वमन - विरेचनादी पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी, विविध औषधी कल्प देऊन या आजाराची चिकित्सा करता येते.